दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२४ | फलटण |
बारामतीची सुवर्णपेढी ‘चंदूकाका सराफ’ आता फलटणमध्ये येत असून रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शिंगणापूर रोड येथे या सुवर्णपेढीचा शुभारंभ होत आहे.
सोन्यातील १८२७ पासूनची परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता आता फलटणला मिळणार आहे. परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता या पंचसूत्रावर आधारित विश्वास संपादन केलेली, संपूर्ण महाराष्ट्रात १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली ‘चंदूकाका सराफ’ ही सुवर्णपेढी आता आपल्या सेवेसाठी फलटणमध्ये दाखल होत आहे. या शुभारंभाच्या क्षणात सर्वांनी सहभागी व्हावे आणि शुद्ध व कलात्मक दागिन्यांची श्रृंखला पाहावी, असे आवाहन ‘चंदूकाका सराफ’ सुवर्णपेढीतर्फे करण्यात आले आहे.
रविवार, २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शिंगणापूर रोड, फलटण येथे या सुवर्णपेढीचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होत असून यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या शुभारंभप्रसंगी सर्व फलटणकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. किशोरकुमार जिनदत्त शहा, कु. सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे.
पाच दिवस पाच ‘ज्युपिटर’ स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी…
दरम्यान, फलटणमधील या शुभारंभानिमित्त ‘चंदूकाका सराफ’ सुवर्णपेढीतर्फे पाच दिवस पाच ‘ज्युपिटर स्कूटर’ जिंकण्याची सुवर्णसंधी ठेवण्यात आली आहे. रु.२०,००० पासून पुढील खरेदीवर व रु. ३,००० व पुढील गुंतवणुकीवर १ ज्युपिटर जिंकता येणार आहे. ही ऑफर कालावधी २८ जुलै २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंतच ठेवण्यात आली आहे.