स्थैर्य, दि.१८: सोन्याने यावर्षी
गुंतवणूकदारांना 32% परतावा दिला आहे. गेल्या वर्षी दिवाळीत हा आकडा 21%
होता. 2020 मध्ये अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉर आणि कोरोना लसीच्या
अपेक्षेने सोन्याच्या किंमती कमी-जास्त झाल्या. मंगळवारी सोने वायदा मल्टी
कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर 50,841 प्रति 10 ग्रामवर बंद झाले.
9 वर्षातील सर्वोत्तम परतावा
परताव्याच्या
बाबतीत सोन्याने यंदाच्या दिवाळीला 9 वर्षांतील सर्वोत्कृष्ट परतावा दिला.
2011 मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना 38% परतावा दिला होता. 2011 मध्ये
दिवाळीला MCX फ्यूचरवर सोन्याचे भाव 27,359 रुपए प्रति 10 ग्राम होते. जे
यावर्षी 50,679 रुपए प्रति 10 ग्राम राहिले. या अर्थाने, सोन्यातील
गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षात 85% परतावा मिळाला.
वर्ष | MCX फ्यूचर्स वर सोन्याचा भाव | दिवाळीपासून दिवाळीचे रिटर्न |
2020 | 50,679.5 | 32.43% |
2019 | 38,269 | 20.71% |
2018 | 31,702 | 7.11% |
2017 | 29,598 | -1.61% |
2016 | 30,082 | 17.11% |
2015 | 25,686 | -6.53% |
2014 | 27,481 | -7.86% |
2013 | 29,826 | -6.14% |
2012 | 31,778 | 16.15% |
2011 | 27,359 | 37.52% |
किंमतीत सतत चढ-उतार
यावर्षी
ऑगस्टमध्ये कोरोना व्हॅक्सीनच्या आशेने सोन्याचे भाव वाढून 56,191 वर
पोहोचले होते. जो याचा सर्वोच्च स्तर आहे. बाजार तज्ज्ञांचा असा विश्वास
आहे की कोरोना महामारी, अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि कच्च्या तेलाच्या
उत्पादनावरील संघर्षासारख्या घटनांमुळे सन 2020 मध्ये सोन्याचे दर चढ-उतार
झाले. MCX वर डिसेंबरमध्ये डिलीवर होणाऱ्या सोन्याची किंमत मंगळवारी 0.02
टक्क्यांनी वाढून 50,841 रुपये प्रति ग्राम झाली. यामध्ये 8,460 लॉटसाठी
उलाढाल झाली. त्याच वेळी न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 0.17% वधारून ते
1,884.50 डॉलर प्रति औंसवर व्यवसाय करत होते.