डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याची झळाळी फिकी


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । मुंबई । सोन्याच्या किंमती प्रति औंस २०८० डॉलरपासून (४ मे २०२३) प्रति औंस १९८९ (१७ मे २०२३) डॉलरपर्यंत घटल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींमध्ये अशाच प्रकारे घट झाली असून याच कालावधीत प्रति १० ग्रॅम ६२००० वरून प्रति १० ग्रॅम ६०९२७ पर्यंत आल्या आहेत.

अलीकडील काळात आर्थिक माहितीमध्ये (इकॉनॉमिक डेटा) मजबूती दिसून आल्यामुळे व्याजदरातील घट थोडा काळ थांबू शकते असा अभिप्राय यूएस फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अलीकडील आठवड्यांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, अमेरिकेतील रिटेल विक्री एप्रिल महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी वाढली आहे. परंतु मुलभूत प्रवाह मजबूत होता. त्यातून असे दिसून आले की, या वर्षात मंदीचा धोका वाढता असला तरी ग्राहकांच्या खर्चात दुसऱ्या तिमाहीच्या सुरूवातीच्या काळात वाढ असेल. एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे रिटेल विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दिसून आलेल्या कार्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून आली आहे. कामगार बाजारपेठ दृढ असल्यामुळे वेतनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खर्चही वाढले आहेत.

पुढे जात असताना अर्थव्यवस्थेतील मजबूती जीडीपीच्या आकडेवारीत दिसून येऊ शकते. मागील तिमाहीत अर्थव्यवस्था वार्षिक १.१ टक्के दराने वाढली. एटलांटा फेडकडे दुसऱ्या तिमाहीत २.७ टक्के वेगाने वाढ होऊ लागली असून जीडीपीमध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होणे, डॉलरमध्ये वाढ आणि अलीकडील आर्थिक माहितीतील मजबूतीमधून सोन्याच्या किंमती आगामी आठवड्यांमध्ये आणखी सुधारतील असे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमती नजीकच्या भविष्यात १९४० डॉलरपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे (सीएमपी: $१९८८/औंस) आणि एमसीएक्स सोन्याच्या किंमती याच कालावधीत ५९०००/१० (सीएमपी: ६०२००/१० ग्रॅम) पर्यंत जातील, असे दिसते.


Don`t copy text!