स्थैर्य, फलटण दि.६ : गव्हाच्या जातीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सतत संशोधन होत असते. 1965 च्या सुमारास मेक्सिको येथे तयार झालेल्या जाती भारतात लागवडीसाठी आणल्या गेल्या. त्यांच्यापासून सुधारित वाणे तयार केली गेली आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हामधील गोल्ड 23 हे वाण शेतकर्यांसाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा फायदा शेतकर्यांना चांगल्या प्रकारे होत आहे, असे मत श्रीराम सहकारी साखर कारख्यान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.
विडणी, ता. फलटण येथे औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड सीड्स या कंपनीच्या गहू गोल्ड 23 या वाणाच्या पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन शरद आदलिंगे यांच्या शेतावर करण्यात आलेले होते. त्यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे बोलत होते. यावेळी विडणीचे सरपंच संजय अभंग, विडणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल अभंग, माजी सरपंच सुरेश शेंडे, डॉ.अरुण अभंग, शेतकरी सोनबा आदलिंगे, उत्तम आदलिंगे, आर.एम.व्होरा, सी.पी. दोषी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाप्रसंगी औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड सीड्स या कंपनीचे प्रतिनिधी संदीप खेसे व गणेश होळकर यांनी यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. आभार शरद आदलिंगे यांनी मानले.