दैनिक स्थैर्य | दि. १६ जानेवारी २०२५ | फलटण | खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा गोखळी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक योगेश पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यात आला आहे.
यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सुरज संजय गावडे, अमोल अरुण गावडे, श्रीकांत तानाजी गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.