मी देव पाहिला या विषयावर “देव रूप” काव्य


देव नसे देव्हारी
असे तो अंतरात,
मी देव पाहिला
निर्मळ ह्रदयात,

निरागस बालक
बोल बोबडे लोभस,
मी देव पाहिला
रुपात त्या राजस,

येतो संकटी धावून
देतो मदतीचा हात,
मी देव पाहिला
त्या माणसाच्या रुपात,

सुर्य मावळे,उगवे
छटा पसरे आकाशात,
मी देव पाहिला
डोलणार्या त्या पिकात,

निसर्गात नांदे
फुलवी जुई, जाई,
मी देव पाहिला
सर्वा ठाई ठाई.

– प्रतिभा मधुकर जाधव
फलटण, सातारा. ८८०५०९१०७६


Back to top button
Don`t copy text!