स्थैर्य, सातारा दि. 02 : साताऱ्यातील खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या प्रत्येक कृतीची बातमी होते. त्यांची स्टाईल राज्यात प्रसिद्ध होते. आषाढी एकादशीला श्री छ उदयनराजे भोसले यांनी कास पठार रस्त्यावर सकाळी लवकर उठून योगा व हलका व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे. तर सायंकाळी दहा किलोमीटर चालण्यास दररोज सुरुवात केली आहे. त्यांच्या या स्टाईलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
साताऱ्यातील कास पठारावर अनेक लोक सकाळी व सायंकाळी फिरण्याचा व्यायाम करतात तर काही जण सूर्यास्तानंतर गपचूप पार्टीला जातात. त्यामुळे विविध प्रकारच्या फूलांपेक्षा इतर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याचे सातरकरांना ही नवल वाटत नाही. काल सकाळी लवकर उठून व त्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता श्री छ उदयनराजे भोसले हे आपल्या निवडक सहकारी पंकज चव्हाण, काका धुमाळ, जितू खानविलकर, श्रीकांत भणगे, व बॉडी गार्ड प्रशांत यांच्या सह कास पठार रस्त्यावर चालत निघाल्याचे पाहून ग्रामीण भागातील शेतकरी व दुध घालण्यासाठी तसेच भाजीपाला विक्रीकरून आपापल्या घरी निघालेल्या लोकांनी आपली वाहने उभी करून राजांना आपुलकीने मुजरा केला. त्यांनी फिटनेस कडे लक्ष देण्याची ठरविल्याने त्यांचे हजारोंच्या संख्येने चाहते वर्ग खुश झाले आहेत. यापूर्वी राजांनी शाहूपुरी येथील रस्त्याच्या ट्रकवर चालण्याची सुरुवात केली होती. त्याची आठवण ताजी झाली आहे.
श्री छ उदयनराजेंचे कट्टर समर्थक व पंकज चव्हाण डान्स अकॅडमीचे पंकज चव्हाण व इतर सहकारी हे त्यांच्या सोबत होते. त्यांना ही व्यायामाची गोडी लागली आहे. कास पठार येथील शुद्ध हवा व सामाजिक अंतर ठेवून चालण्यास दस्तुरखुद्द राजे आल्याने त्यांची झलक मोबाईल कॉमेरात घेण्यासाठी काही युवकांनी ही धावण्याचा सराव करून घेतला.
श्री छ उदयनराजे हे कुठे ही गेले तरी त्यांची एन्ट्री सर्वानाच भुरळ घालतात. युवकांचे आयडॉल असल्याने त्यांचे अनुकरण सर्वच करतात. पण, काही मोजकेच लोक त्यांच्या सारखे इंग्रजी बोलतात. सामाजिक बांधिलकी जपतात. हे जरी खरे असले तरी कालची श्री छ उदयनराजे यांची झलक,, सब से अलग,, असल्याची खात्री अनेकांनी पटली आहे. बॉडी बिल्डर्स, जिम, रेसिंग याची त्यांना आवड असून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून ते प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय सहभाग घेतात. आता सकाळी व सायंकाळी फिरण्याची त्यांची स्टाईल कोण कोण मनापासून करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.