स्थैर्य, सातारा, दि.१२ : सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या दाव्याचा न्यायालयात नुकताच निकाल लागला आहे. सज्जनगडावर जमविलेली सर्व स्थावर मालमत्ता समर्थ सेवा मंडळाने संस्थानच्या ताब्यात द्यावी, आदेश येथील न्यायालयाने निकालात दिला आहे.
सेवा मंडळाने संस्थानचे प्रतिनिधी म्हणून निधी गोळा करून संस्थानच्या सज्जनगड येथील मिळकतीमध्ये इमारती बांधून स्वतःचा मालकी हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सज्जनगड देवस्थान संस्थानच्या मालकी हक्कातील असताना स्वतःची समांतर व्यवस्था निर्माण करून देणग्या गोळा केल्या. संस्थानचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे असताना गैरफायदा करून घेतल्याने प्रतिनिधीपद रद्द करावे व मिळकतीचा कब्जा, हिशोब, रकमा व ताकीद मागणीसाठी श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने विश्वस्त सु. ग. स्वामी आणि इतरांनी श्री समर्थ सेवा मंडळ आणि त्यांचे मार्गदर्शक, विश्वस्त यांच्या विरोधात 2003 मध्ये दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल नुकताच लागला आहे.