स्थैर्य, मुंबई, दि. १४: वर्तमानपत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन मध्ये आधीस्वीकृतीधारक पत्रकारांप्रमाणे सूट अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे लेखी निवेदनातून मागणी केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. १३ एप्रिल रोजी रात्री ०८.३० वाजता सोशल मिडीया लाईव्ह द्वारे कोरोना कोविड – १९ विषाणू प्रादुभार्व रोखण्याच्या अनुषंगाने लॉकडाऊन बाबत जनतेशी संवाद साधताना फक्त आधीस्वीकृतीधारक पत्रकारांना सूट दिली. त्याबाबत महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन क्र. DMU/२०२०/CR/९२/DisM-१ दि. १३ एप्रिल २०२१ रोजीचे ब्रेक द चेन चे आदेश निर्गमित केले. पण, महाराष्ट्र राज्यात अनेक दैनिक, सायं दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक असे वर्तमानपत्र आहेत. या सर्व वर्तमानपत्रात काम करणारे संपादक, उप संपादक, विशेष प्रतिनिधी, वार्ताहर, छायाचित्रकार यांच्या कडे ” अधिस्वीकृतीधारक ” चे ओळखपत्र असेलच असे नाही त्याचबरोबर DTP ऑपरेटर, छपाई कारखान्यातील कामगार, तसेच वर्तमानपत्राशी निघडीत असलेले सर्व कर्मचारी यांना टाळेबंदी मध्ये सूट देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने त्वरित भारत सरकार RNI असलेल्या व महाराष्ट्र शासन मंत्रालय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या मान्यता प्राप्त यादीत असलेल्या वर्तमानपत्र. यांच्याशी निघडीत असलेल्या सर्वांना कर्मचाऱ्यांना ” अधिस्वीकृतीधारक ” पत्रकार यांच्या प्रमाणेच लॉकडाऊन मध्ये सूट द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे व मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांच्या कडे पत्रकार सुरक्षा समिती चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी ई-मेल द्वारे मागणी केली आहे.