स्थैर्य, फलटण, दि. १६ : कोरोनाच्या जागतिक महामारी मध्ये फलटण शहरामध्ये काम करत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी आग्रही मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.
फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी कोरोना योद्ध्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, याबाबतचे सविस्तर निवेदन फलटणच्या प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिले. या वेळी नितीन जगताप, आनंद वनवे, विशाल बाबर, सचिन भोसले, कैलास पवार, संकेत लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर निवेदनामध्ये फलटण शहरामध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रशासनाला सहकार्य म्हणून आपला जीव धोक्यात घालून काही कोरोना योद्धे कार्यरत होते. तरी सदरील कोरोना योद्ध्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने देण्यात यावी, असे स्पष्ट केलेले आहे.