
स्थैर्य, फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून गेली 25 वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार फलटण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचविण्याचे काम सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे शांत, संयमी व सुसंस्कृत नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या खंबीर साथीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याच्या कानाकोपऱ्या मध्ये पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे, या कार्याची दखल घेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते तथा सातारा जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे.
श्रीमंत संजीवराजे हे राजकीय क्षेत्राबरोबर, सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातही सतत क्रियाशील असून ते महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत. श्रीमंत संजीवराजे यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचे राजकारण व समाजकारण केले असल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये श्रीमंत संजीवराजे यांची एक आगळी वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव होणे ही सर्वसामान्य फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. या भावनेचा विचार करून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून श्रीमंत संजीवराजे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे असेही प्रत्रकात चोरमले यांनी म्हणले आहे.
आजपर्यंत श्रीमंत संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रयत्न केले आहेत. म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्रजी पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.ना. जयंत पाटील यांनी श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर यांची आमदार म्हणून निवड करून त्यांना काम करण्याची संधी प्राप्त करून द्यावी असेही पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.