गिरवी ते तुळजापूर यात्रा सोहळ्याचे १५ ते २३ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्री तुळजाभवानी विकास प्रतिष्ठान गिरवी द्वारा आयोजित गिरवी (फलटण)-तुळजापूर यात्रा सोहळा आयोजित केला असून हे यात्रा सोहळ्याचे २३ वे वर्ष आहे.

या यात्रा सोहळा रविवार, दि. १५ ऑक्टोबर ते सोमवार, दि. २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अशी ९ दिवसांची पायी वारी आहे. रविवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुधेबावी डोंगरावरील देवी मंदिरापासून दुपारी ३ वाजता भाविकभक्तांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रेचे प्रस्थान होणार असून संध्याकाळी अन्नपूर्णा मंदीर, जाधववाडी (फलटण) येथे मुक्काम आहे.

सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता अन्नपूर्णा मंदिर जाधववाडी येथून पालखीचे प्रस्थान होऊन दुपारी साधूबुवा मंदिर, राजुरी येथे विश्रांती व रात्रीचा मुक्काम कवितके सांस्कृतिक भवन स्टॅण्डसमोर, नातेपुते येथे होणार आहे.

मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी गांधीबाग, माळशिरस येथे विश्रांती, इंग्लिश हायस्कूल सांगोला रोड, वेळापूर येथे मुक्काम. बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी पालखी तळ, भंडी शेगाव येथे दुपारची विश्रांती, विष्णू सहस्त्रनाम मठ, पंढरपूर येथे मुक्काम.

गुरुवार, दि. २० ऑक्टोबर रोजी गरूड झेप बोडके शेती फार्म, मोहोळ येथून दुपारी ३ वाजता प्रस्थान, शिरापूर हायस्कूल येथे मुक्काम.

शनिवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी घाडगे शेती फार्म, वडाळा येथे दुपारची विश्रांती, सावरगाव (खडी क्रशर) येथे मुक्काम.

रविवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी नागोबा मंदिर, सांगवी येथे दुपारची विश्रांती, शिवपार्वती मंगल कार्यालय, तुळजापूर रोड येथे मुक्काम.

सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी देवीस भोगी व अभिषेक व दुपारी १२ वाजता घट उठल्यानंतर महाप्रसाद व महाप्रसाद घेतल्यानंतर यात्रेची समाप्ती होईल.

शनिवार, दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुधेबावी मंदिरात सकाळी ८ वाजता अभिषेक व सायंकाळी ६ वाजता गिरवी येथील माळावरील देवी मंदिरापासून पालखीची ग्रामप्रदक्षिणा होणार आहे.

या पदयात्रेत सामील होण्यासाठी श्री. रणजित शिवाजीराव कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!