
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93टक्के लागला आहे. इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली.
दहावी परीक्षेसाठी एकूण 49 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थी 07 बहिस्थ व रिपीटर विद्यार्थी -07 होते.
प्रथम क्रमांक कल्याणी प्रदिप किर्वे हिला 88.80 टक्के, व्दितीय क्रमांक ज्योती चरणसिंग पाटोळे हिला 83.00 टक्के, तृतीय क्रमांक दिशा बापुराव धुमाळ हिला 76.00 टक्के गुण मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सह्याद्री कदम, सचिव श्रीमती शारदादेवी कदम, विद्यालयाचे प्राचार्य सस्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग गावडे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
