सुरवडीच्या कौशल्या फौंडेशनच्या वतीने फलटणच्या कन्याशाळेस ग्रंथसंपदा भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सुरवडी येथील कौशल्या फौंडेशनच्या वतीने फलटण येथील सौ. वेणुताई चव्हाण कन्या शाळेस विविध ग्रंथसंपदांची भेट दिली आहे.

सौ. वेणुताई चव्हाण कन्या शाळेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुर्यवंशी – बेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याय आलेले आहेत. याशिवाय स्कॉलरशिपचे सुध्दा विविध वर्ग सुरू करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सुरवडी येथील कौशल्या फौंडेशनच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्रंथसंपदां भेट देण्यात आली.

या कार्यक्रमास कौशल्या फाऊंडेशनचे विश्वस्त संदीप मोहिते, सदस्य सुखदेव अहिवळे व कुमार भोई उपस्थित होते.

कौशल्या फौंडेशनच्या स्थापन करण्याचा उद्देश, ध्येय व धोरणे विश्वस्त संदिप मोहीते यांनी स्पष्ट केली.


Back to top button
Don`t copy text!