मराठी साहित्य संमेलनासाठी गझल कट्टा समिती गठीत


स्थैर्य, सातारा, दि. 11 डिसेंबर : सातार्‍यात होणार्‍या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गझल कट्टा समितीचे गठण करण्यात आले आहे. 99 व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही समिती गठीत केली आहे. या समितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना संधी देण्यात आल्याची माहिती 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

राजधानी सातार्‍यात तब्बल 32 वर्षानंतर जानेवारी 2026 मध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत. संमेलनाचे नियोजन नेटके आणि वैशिष्टयपूर्ण व्हावे यासाठी विविध समित्या तयार करण्याचे काम सुरु आहे. नुकतेच मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती, ग्रंथदिडी, शोभायात्रा समिती, साहित्यिक व ऐतहासिक दालन समिती, जिल्हा ज्योत समिती जाहीर, तालुका ज्योत समिती, प्रकाशन कट्टा समिती करण्यात आली आहे. आता 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गझल कट्टा समिती गठीत करण्यात आली आहे.
सातार्‍याच्या लौकिकाला साजेसे, वैशिष्टयपूर्ण

संमेलन व्हावे यासाठी पहिल्यापासून आयोजकांचे प्रयत्न सुरु आहेत. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साजेसा गझलकट्टा होईल. हा गझलकट्टा दीर्घ काळापर्यंत सातारकरांच्या स्मरणात राहील, असा प्रयत्न समितीकडून होईल अशी खात्री आयोजकांना आहे.
या गझल कट्टा समितीचे प्रमुख कल्याण शिंदे हे असून विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत मार्गदर्शक आहेत. हेरंब जोशी हे मुख्य समन्वयक, तर विश्वास कुलकर्णी समन्वयक आहेत. समितीमध्ये संजय गोरडे, शिव डोईजोडे, संजय इंगळे तिगांवकर, महेश गोरे, तुषार शिंदे, सौ. अलका बेडकिहाळ, वसंत शिंदे, विलास वरे, सौ. संयोगिता माजगावकर या सदस्यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!