फलटणच्या राजघराण्यातील “जनरेशन नेक्स्ट” : श्रीमंत सत्यजीतराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


– चैतन्य रुद्रभटे, फलटण. (पुनःप्रकाशित)

फलटण संस्थानला बाराशे वर्षांचा जाज्वल्य इतिहास आहे. बाराशे वर्षांपासून नाईक निंबाळकर राजघराण्याचे आणि फलटणकरांचे अतूट ऋणानुबंध आहेत. ज्या-ज्या वेळी फलटण आणि विकास या विषयाची माहिती लिहावी लागेल, त्या-त्या वेळी नाईक निंबाळकर राजघराण्याचा उल्लेख करावाच लागेल. स्व. श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी उभारलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरापासून ते अगदी अलीकडे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील फलटणचा विचार केल्यास इथल्या जनतेचा विविध क्षेत्रातील स्तर उंचावण्यासाठी नाईक निंबाळकर राजघराणे अग्रभागी राहिले आहे.

“अपत्य स्थाने प्रजा जन:” हे ब्रीद उराशी बाळगून स्व. श्रीमंत मालोजीराजे यांचा वारसा चालवत स्व. श्रीमंत शिवाजीराजे यांनी राजघराण्याची ही परंपरा जोपासली. श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी देखील फलटणकरांसोबत सोबत असणाऱ्या या ऋणानुबंधाला तडा जावून दिला नाही. आता हीच जबाबदारी राजघराण्यातील पुढच्या पिढीवर येऊन ठेपली आहे. आज राजघराण्याच्या पुढच्या पिढीतील श्रीमंत सत्यजीतराजे यांचा वाढदिवस. त्यानिमित्त…

फलटणच्या तालुक्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीमंत सत्यजीतराजे हे हुबेहूब आपल्या वडिलांप्रमाणेच आहेत. सध्या कोणत्याही राजकारणात न पडता गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या माध्यमातून ते आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. श्रीमंत संजीवराजे (बाबा) हे “बिझनेसमन” असतील तर श्रीमंत सत्यजीतराजे हे “इंडस्ट्रियालिस्ट” आहेत. फक्त ‘गोविंद’च नव्हे तर कुरोली फुडस्, श्रीराम बिल्डर्स अँड प्रमोटर्स, इंडस, मॅग्नेशिया केमिकल्स, अरिस्ता केमिकल्स यासह विविध छोट्या मोठ्या उद्योगात त्यांची कर्तबगारी दिसून येते. विविध क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्या या “टच”मुळे फलटणमधील क्रीम आणि बुद्धिजीवी वर्गाशी त्यांचे जवळचे संबंध दिसून येतात. अर्थातच श्रीमंत सत्यजीतराजे आपल्या वडीलांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

करारी नजर, तोच शांत-संयमी स्वभाव, जनमाणसाच्या काळजात घुसण्याची त्यांची स्टाईल आणि समोर असलेल्या व्यक्तीशी बोलण्याची त्यांची पद्धत मात्र हुबेहूब “बाबा”च समोर असल्याचा भास करते. आगामी काळात ते राजकारणात येतील याची सर्वांनाच खात्री आहे. पण, कधी येतील हे सध्याच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही. जेंव्हा केंव्हा श्रीमंत सत्यजीतराजे राजकारणात येतील तेंव्हा त्यांची एन्ट्री ही ग्रँड एन्ट्रीच होणार, हे नक्की. राजघराण्याचा वारसा जपण्यासाठी व फलटणकर जनतेशी आपले ऋणानुबंध जोपासण्यासाठी त्यांनी लवकर राजकारणात यावे, हीच या वाढदिनी प्रभू श्रीराचंद्रचरणी प्रार्थना…!


Back to top button
Don`t copy text!