टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; जानेवारीतील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ४ जानेवारीला मॉक टेस्ट होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २७ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचे (जीसीसी-टीबीसी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये ऑनलाइन पद्धतीने ६ ते २१ जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

इंग्रजी आणि मराठी-हिंदी परीक्षांच्या तारखा निश्चित

वेळापत्रकानुसार, इंग्रजी ३०, ४० व ५० शब्द प्रति मिनिट या गतीच्या परीक्षा दि. ६ ते १२ जानेवारी दरम्यान घेतल्या जातील. त्यानंतर मराठी आणि हिंदी ३०, ४० तसेच इंग्रजी ६० शब्द प्रति मिनिट गतीच्या परीक्षा दि. १६ ते २१ जानेवारी दरम्यान होणार आहेत. दररोज पाच सत्रांमध्ये या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

४ जानेवारीला मॉक टेस्टचे आयोजन

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना सराव करता यावा यासाठी दि. ४ जानेवारी २०२७ रोजी मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी आपला बॅच कोड, विषय कोड आणि परीक्षेची वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन परिषदेने केले आहे. तसेच सर्व संस्थाचालकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना त्याबाबत अवगत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!