गवळी समाजातील २०२१-२०२२ ह्या वर्षात उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार करणे आणि समाज संघटित करून सामाजिक उत्कर्ष साधने हा प्रमुख उद्देश ठेवून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संघटनेचे सचिव दिनू रिकामे यांनी दिली.
या कार्यक्रमाला स्थानिक युवा आमदार माननी क्षितिज दादा ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी संघटनेला मार्गदर्शन केले आणि भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे जाहीर करत समाजातील मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते संघटनेचे अध्यक्ष विपुल पोरे यांचा सत्कार करून दादांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
ह्यासोबतच कार्यक्रमाला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट या गवळी समाजातील शिखर संस्थेचे अध्यक्ष अशोक दाते साहेब, सभापती भरत मकवाना साहेब, माजी सभापती प्रशांत राऊत साहेब, समाजसेवक झहीर भाई शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख साहेब , उपशहर प्रमुख उदय दादा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संघटने तर्फे मुरलीधर काते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अविनाश काते यांनी सांभाळली तसेच चित्रा काते आणि सौ. अस्मिता पोरे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना पुढील करियर संधर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला कार्यकारणी आणि स्वयंसेवक यांनी खूप मेहनत घेऊन संघटनेचा पहिलाच कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पाडला.
एक संघटनेचे स्वप्न घेऊन जो प्रवास सुरु केला आहे तो योग्य दिशेने होत आहे ह्याच समाधान खूप मोठं आहे, ह्या कार्यक्रमाचे श्रेय हे सर्वस्वी आमचे प्रत्येक स्वयंसेवकांचे आहे ज्यांनी ह्यात अथक परिश्रम घेऊन खूप चांगल्या प्रकारे नियोजन केले.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विपुल पोरे , सचिव दिनू रिकामे सोबत कार्यकारणी विशाल रिकामे, विलास धुमाळ, अविनाश काते, संतोष तटकरे, उमेश दर्गे , सचिन रिकामे, भावेश महाडिक, अभिनंदन नटे, चंद्रवदन महाडिक,सुशांत घोले, सुदेश महाडिक, संतोष रिकामे, मुरलीधर काते, महेश रिकामे, विजू रिकामे, प्रकाश रिकामे, सुरेंद्र किळजे ,निलेश काते,सागर कांबळे सोबत सर्व स्वयंसेवक इत्यादींनी आपले उपक्रमास वैयक्तिक हातभार लावून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.