
दैनिक स्थैर्य । दि. 02 जुन 2025 । कोळकी । येथील सुकन्या कु. गौरी विवेक स्वामी हिने एमपीएससीच्या माध्यमातुन जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणुन निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल कोळकी ग्रामस्थांच्यावतीने कु. गौरीचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, काळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपा नेते जयकुमार शिंदे, काळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. अशोक नाळे, कोळकीच्या माजी सरपंच सौ. रेश्मा देशमुख, सौ. स्वप्ना कोरडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे, माउली शिंदे, सदस्या सौ. रुपाली चव्हाण, युवा नेते पै. संजय देशमुख, उदयसिंह निंबाळकर, विक्रम पखाले, प्रदिप भरते, देवेंद्र जंगम, सौ. वंदना जंगम, विवेक स्वामी, विवेक लाटे, सागर चव्हाण, अक्षय मुळीक, रामदास आडके, अनिल कुंभार, केदार गोसावी यांच्यासह विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी कु. गौरी स्वामी हिचे सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

