गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी ‘गौरी सजावट’ आणि ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेचे आयोजन

'रक्षक रयतेचा न्यूज' व विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम; विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची संधी


स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘रक्षक रयतेचा न्यूज’ आणि फलटणमधील विविध नामांकित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील महिलांसाठी ‘भव्य गौरी सजावट’ आणि पुणे व सातारा जिल्ह्यातील महिलांसाठी ‘सेल्फी विथ बाप्पा’ या स्पर्धांचा समावेश असून, या स्पर्धांना १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

या स्पर्धांचे आयोजन रक्षक रयतेचा न्यूज, गगनगिरी ज्वेलर्स, सहयोग सोशल फाउंडेशन, शार्विच कॉस्मेटिक अँड ज्वेलरी, मूळचंद मिल, भारती हॉस्पिटल, चैतन आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र आणि कॉर्नर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक यांनी केले आहे. स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि एक हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेतील बक्षिसे:

  • प्रथम क्रमांक : १ ग्रॅम फॉर्मल नेकलेस
  • द्वितीय क्रमांक : पैठणी साडी
  • तृतीय क्रमांक : आकर्षक गिफ्ट हॅम्पर
  • चतुर्थ क्रमांक : डिनर सेट

या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता, टेलिफोन एक्सचेंज शेजारील नवीन नगरपालिका हॉल, फलटण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले असून, त्याद्वारे पैठणी, गिफ्ट हॅम्पर, इस्त्री यांसारखी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या दिवशी भारती हॉस्पिटलच्या वतीने उपस्थित महिलांसाठी मोफत दंत तपासणी आणि मोफत वंध्यत्व तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, फलटण नगरपरिषदेमार्फत बचत गट आणि महिलांसाठी विविध शासकीय योजना व कर्ज प्रकरणांची माहिती दिली जाणार आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक महिलांनी खालील क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • ८०१०२३९०६२
  • ७०५७८३१६८८
  • ९७६६०००३२०
  • ९४२०९९९९१७
  • ७०२०४६७६८२
  • ९२८४२७४९१३
  • ९८६०१८१८३८
  • ८८३०३११२१३
  • ९६७३१६९१९१


Back to top button
Don`t copy text!