श्रीमंत मालोजीराजे विद्यामंदिरात गणेश प्रतिष्ठापना आणि जयंती उत्सव उत्साहात संपन्न

डॉ. सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते 'श्रीं'ची स्थापना; श्रीमंत मालोजीराजे यांना अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दुहेरी सोहळ्यामुळे प्रशालेच्या वातावरणात मांगल्यासह अभिमानाची भावना संचारली होती.

याप्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या शुभहस्ते श्री गणेश मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर त्यांनी श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे उपाध्यक्ष श्री. सी. एल. पवार, नियामक मंडळाचे सदस्य श्री. शिवाजीराव विश्वासराव सूर्यवंशी (बेडके), चि. रिद्धिमान सचिन सूर्यवंशी (बेडके) आणि कु. शर्मदा सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. के. एन. बेडके, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

Back to top button
Don`t copy text!