दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । आंदरूड (ता.फलटण) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी हे उद्यानदूत म्हणून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकर्यांना येणार्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीतजास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत उद्यानदूत अमृत गायकवाड, आकाश चव्हाण, शुभम भोसले, रोहन भोसले, विराज भामे व रेहान खान हे शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.निंबाळकर, कृषि महाद्यिालयाचे प्राचार्य यू.डी.चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्हीं. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.