गंगाराम जगताप यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि.०३: फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील पोस्टमास्तर श्री. गंगाराम राजाराम जगताप ( 58) यांचे अल्पशा आजारपणामुळे दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले.

फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य, साप्ताहिक रामआदेश चे संपादक बापूराव राजाराम जगताप यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी,दोन मुली, दोन मुलगे,एक भाऊ,एक बहिण असा परिवार आहे.

गोखळी स्मशानभूमी मध्ये बौद्ध पध्दतीने करण्यात आला. कोरोना पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन अंत्यविधी पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!