दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२३ । वडूज । सर्व समाजाला न्याय देण्यासाठी खटाव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात सर्व ताकदीने रिपब्लिकन पक्ष रिंगणात उतरवले जाणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे माजी खटाव तालुकाध्यक्ष गणेश भोसले यांनी दिली आहे.
वडुज ता. खटाव येथे शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत खटाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणक व राजकीय विषयांवर प्रमुख रिपब्लिकन कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील सर्व समाज्याची आघाडी करून संघटन बुलंद करणे. अन्याय अत्याचार संदर्भात खेड्यापाड्यात जावून आवाज उठविला जाणार आहे. महिलांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. असे मत महिला आघाडीच्या राज्य संघटक गौतमीताई मसणे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रिपाई पक्ष वाढविण्यासाठी हेवेदावे बाजूला सारून काम करावे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे विचार तळागाळात पोहविण्यासाठी प्रयत्न करावेत असे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वायदंडे, अक्षय कांबळे , रवि बाबर यांनी सांगितले. सातारा जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती ही रिपाई स्वतंत्र निवडणूक लढवून तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कार्यकर्ता यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. असे श्री भोसले यांनी स्पष्ट केले. यावेळी संदिप काळे , विक्रम डोईफोडे, विठ्ठल नलवडे, शंकर येवले, मोहन तुपे, सतिश सावंत, भिमा सावंत, अजिंक्य वाघमारे, शिवाजी तिडके, अभिजित बोकडे, युवराज रणदिवे, दत्तात्रय गायकवाड,. जितेंद्र सोनवले, चरणदास सोनवले, आप्पासाहेब निकाळजे, सुनिल मिसाळ, विनोद बनसोडे, जीवन तिडके, सुजल मसणे, अमोल फडतरे पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.