दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा वनपरिक्षेत्रातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची माहिती मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी बुधवारी वनभवन सातारा येथे गांधीगिरी केली.
सातारा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांना मोहिते यांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली . यावेळी तालुका प्रमुख अनिल गुजर, अतिश ननावरे , मोहन इंगळे , रमेश सावंत, उप तालुकाप्रमुख प्रशांत शेळके, विभाग प्रमुख हरिभाऊ पवार, सुनील साळुंखे, संजय इंगवले, सागर धोत्रे, शिवराम मोरे, रामदास कदम, अजय सावंत, अक्षय जमदाडे, सागर रायते निखिल पिंपळे राहुल जाधव , महेश शेडगे यावेळी उपस्थित होते.
सातारा तालुका वन विभाग कार्यक्षेत्रात होणाऱ्या भ्रष्ट कारभाराची माहिती पुराव्यासहित उपवंनसंरक्षक महादेव मोहिते यांना दिले होते . सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनाही निवेदन देउून या संदर्भातील मागणी केली होती . मात्र यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने सचिन मोहिते डॉ चव्हाण यांना गुलाबपुष्प देऊन माहिती देण्याची सनदशीर मार्गाने विनंती केली . या माहितीच्या अनुषंगाने जी कागदपत्रे मिळाली ती अपुरी असल्याचा दावा मोहिते यांनी केला .वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवत असल्याचा आरोप यावेळी मोहिते यांनी केला . या प्रकरणी गेल्या पाच महिन्यात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले . या प्रकरणी कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.