दैनिक स्थैर्य | दि. १४ जून २०२४ | फलटण |
गोपाळ सरक लिखित ‘गांधी व्हर्सेस गब्बर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १६ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते उपळेकर महाराज मंदिर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी, फलटण येथे संपन्न होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ भूषविणार असून मुधोजी महाविद्यालय फलटणचे तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. नवनाथ रासकर, मराठी चित्रपट ‘पळशीची पीटी’चे दिग्दर्शक धोंडीबा कारंडे, ग्रामीण कथाकथनकार रवींद्र कोकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, या प्रकाशन सोहळ्यानंतर दुपारी १.३० ते २ या वेळेत स्नेहभोजन होणार असून त्यानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचा विषय ‘साहित्य, सिनेमा आणि आपण’ हा असून यामध्ये धोंडीबा कारंडे, अर्जुन सोनवणे (कवी, लेखक), सिनेरसिक महेश यादव हे भाग घेणार आहेत.
यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक सौ. अलका बेडकिहाळ (साप्ताहिक लोकजागर), सौ. सीमा सरक, मैत्री पब्लिकेशनच्या मोहिनी कारंडे यांनी केले आहे.