
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२५ | पुणे |
फलटण (जि. सातारा) येथे मुख्यालय असलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचा पिंपरी चिंचवड येथे उद्घाटन सोहळा १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता सचिन यादव आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गॅलेक्सी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकार्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ही पतसंस्था येणार्या काळात भरभराटीला येऊन तिच्या पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त शाखा सुरू होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
संस्थेचे संस्थापक चेअरमन व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गॅलेक्सी या पतसंस्थेने आपल्या मजबूत आर्थिक सेवा आणि समुदायाच्या विकासासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी झपाट्याने नावलौकिक मिळवला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देऊन संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच विविध आकर्षक अशा सुविधा, बचत योजना राबवून सर्वसामान्यांना बचतीची माहिती देऊन सहकारास सामील करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे काम केले आहे आणि सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात आर्थिक सहाय्य देऊन ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशीच अविरहित सेवा देऊन भविष्यात संस्थेचे व ग्राहकांची जीवनमान उंचावण्याचे सचिन यादव यांनी यावेळी बोलून दाखवले.
गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह संस्थेस नुकतेच मिळालेला “अ-वर्ग” सन्मान म्हणजे संस्थेच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शक कारभाराची पोहच पावती आहे.
सुरुवातीच्या काळात फक्त सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी संस्थेने पुणे जिल्ह्यात आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची अधिकृत परवानगी मिळवून पिंपरी चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. २०१९ मध्ये स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील जनतेची यशस्वीपणे सेवा करणार्या या अग्रगण्य सहकारी संस्थेसाठी हा विस्तार एक मोठे पाऊल आहे.
आपल्या गतिमान दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसाठी ओळखले जाणारे सचिन यादव यांनी सहकाराच्या सेवा पुणे जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला आहे. ज्याचा उद्देश दर्जेदार आर्थिक उपायांची वाढती मागणी पूर्ण करणे, हा आहे. सोसायटीच्या विस्तारामुळे पुण्यातील रहिवाशांसाठी, विशेषत: बचत, कर्जे आणि इतर आर्थिक सेवांच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील, अशी अपेक्षा आहे.
गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. संस्थेने सातारा जिल्ह्यात विश्वासाचा एक भक्कम पाया तयार केला असून आपल्या सदस्यांना यशस्वीरित्या आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. या विस्तारासह, या सहकारी संस्थेचे उद्दिष्ट पुण्यात आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आहे. सातारा जिल्ह्यातील गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची यशस्वी घोडदौड पुणे जिल्ह्यात सुद्धा अशीच चालू राहील, असा विश्वास संस्थेचे कर्मचारी, ग्राहक आणि सभासदांनी व्यक्त केला आहे.