दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । आटपाडी । 25 डीसेंबर, 2022 रोजी आटपाडी तालुक्यात प्रथमच गदिमा लघुपट महोत्संव होत आहे. दिनांक – 01 ऑक्टोबर, 2022 पासून 30 नोव्हेंबर 2022 अखेर प्रवेशीका मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये स्पर्धेसाठी 110 लघुपट, 8 माहीतीपट, तर 5 गीतांनी सहभाग नोंदवला आहे. उत्कृष्टं कलाकृतींची निवड करणेसाठी प्रा.बापूसाहेब चंदनशीवे, कला महाविद्यालय, अहमदनगर, बालाजी वाघमोडे व महेश बनसोडे निर्माता, लेखक दिग्दर्शक यांनी परिक्षक म्हणून कामकाज पाहीलेले आहे. उत्कृष्टं लघुपट, उत्कृष्टं माहीतीपट, उत्कृष्टं गीत, उत्कृष्टं लेखक, उत्कृष्टं दिग्दर्शक, उत्कृष्टं कॅमेरामन, उत्कृष्टं संकलक, उत्कृष्टं अभिनेता, उत्कृष्टं अभि नेत्री, उत्कृष्टं बालकलाकार, उत्कृष्टं स्थानिक लघुपट, उत्कृष्टं महिला सक्षमीकरण लघुपट, उत्कृष्टं सामाजीक लघुपट, अशा विविध विभागात प्रथम, दुसरा व तिसरा क्रमांकाचे पारीतोषीक देण्यात येणार आहे. गोल्डन लेडी ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारीतोषीकाचे स्वरुप आहे.
गदिमा लघुपट महोत्सवाचे उदघाटन रविवार दि. 25 डीसेंबर रोजी कल्लेश्वंर मंदीर हॉल येथे सकाळी 9-30 वाजता डॉ.श्री.एम.वाय.पाटील यांचेहस्ते पार पडणार आहे. सकाळी 10.00 वाजलेपासून दुपारी 4.30 वाजेपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजलेल्या व या महोत्सवात सहभागी झालेलया निवडक लघुपटांचे मोफत प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये कावळा उड, यु मस्ट स्पीक, झेलम, पाम्प्लेट, दळण, पावस्या, जोडवं अशा 16 लघुपटांचा समावेश असणार आहे. संपदा अष्टेकर यांचे कथ्थंक तर सोहा महेश वर्षा यांचे भरतनाटयम शास्त्रीय नृत्यं होणार आहे. सायं. 5.00 वाजलेपासून विजेत्या कलाकृतींना भिमराव मुढे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक दिग्दर्शक व मुक्तेश्वंर माडगूळकर, सहा.गटविकास अधिकारी यांच्या हस्ते तर प्रदीप पाटील सर, प्रा. विजय लोंढे प्राचार्य श्रीमंत बा.दे.महाविद्यालय, शरद मेमाणे पोलीस निरीक्षक, सचिन भोसले कृषी अधिकारी, धनंजय पाटील कायदेशीर सल्लागार अ.भा. सरपंच संघटना, डॉ. अनिरुध्द पत्की, डॉ. विष्णू पाटील, डॉ.एन.जे.कदम, इंजि.असीफ कलाल, इंजि.महेश पाटील व अन्यं मान्यवरांच्या उपस्थितीत पारीतोषीक वितरण करण्यात येणार आहे.
महोत्संव संचालक समाधान ऐवळे व संयोजक अनिषा जावीर यांनी सर्व कलारसीकांना या महोत्सवामध्ये सहभागी होवून कलाकृतींचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपणही या महोत्सवामध्ये सहभागी होवून आनंद घ्यावा.