फर्निचरचे दुकान आगीत खाक


दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | सातारा |
सातारा शहरानजीक असलेल्या रामनगर येथील एका फर्निचरच्या दुकानाला मंगळवारी सकाळी ११ वाजता आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले. या आगीत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रामनगर-वर्ये येथे ‘अंबिका फर्निचर’ या नावाचे गोडावून आहे. या गोडावूनला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. दुकानात प्लायवूड होते. त्यामुळे आग क्षणात भडकली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीची माहिती काही नागरिकांनी सातारा नगरपालिका आणि भुईंजच्या अग्निशमन दलाला दिली. काही वेळातच दोन्ही बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य, फर्निचर जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजले नाही.


Back to top button
Don`t copy text!