
स्थैर्य, भाडळी बु., दि. १९ ऑगस्ट : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त, भाडळी बुद्रुक आणि भाडळी खुर्द गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री संगमेश्वर मंदिरात भाविकांना फळे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. मातोश्री संस्था समूह आणि जाणता राजा प्रतिष्ठान, भाडळी बुद्रुक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
श्रावणी सोमवारानिमित्त भाडळी, सासकल, तिरकवाडी, झिरपवाडी यांसह पंचक्रोशीतील अनेक भाविक दर्शनासाठी संगमेश्वर मंदिरात येतात. या सर्व भाविकांसाठी गेली अनेक वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.
यावेळी मातोश्री संस्था समूहाचे चेअरमन मोहनराव डांगे, माजी उपसरपंच दत्तात्रय डांगे, पोलीस पाटील हणमंत सोनवलकर, ह.भ.प. नाना महाराज शेंडे, अर्जुन डांगे, बबन गुंजवटे, जनार्धन डांगे, राम भोईटे, प्रकाश शेंडे, संतोष सावंत, सुनील खरात, संकेत डांगे, सुरज गोरे, ओमकार शिरतोडे, जयवंत शिरतोडे, हर्षद डांगे, गणेश डांगे, प्रशांत शिरतोडे, अभिजीत माने यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.