
दैनिक ‘लोकमत’चे फलटण तालुका प्रतिनिधी आणि भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (शनिवारी) फलटण नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १४ मार्च : दैनिक ‘लोकमत’चे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाभिमुख पत्रकारितेचा वसा चालवणाऱ्या प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज, शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
हा स्तुत्य सामाजिक उपक्रम फलटण शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (बाहुली शाळा) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ आणि फळांचे वाटप करून प्रा. शिंदे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जाणार आहे.
गेली अनेक वर्षे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात निर्भीडपणे कार्यरत असणाऱ्या प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच, शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांकडून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
