दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एजुकेशन सोसायटी संचलित कृषि महाविद्यालय फलटण येथील कृषिदूत, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, गावचे सरपंच, ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांच्याद्वारे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ललगुण येथे शैक्षणिक नववर्षी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासाप्रमाणे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम-२०२४-२५ साठी कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या कृषिदूतांनी ललगुण गावात शैक्षणिक नववर्षाच्या विद्यार्थी स्वागत केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. संजय अडत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कृषिदूत उदयसिंह गायकवाड, गौरव रायकर, ओंकार खेडकर, सुमित बागुल, आदित्य घेवारे, अमितेश बोदडे यांनी स्वागत कार्यक्रमात भाग घेतला.