दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । फलटण । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुश्रुत हॉस्पिटल, रिंग रोड, फलटणच्या वतीने ज्येष्ठ स्त्री शल्य चिकित्सक डॉ. मीरा मगर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली अन्न नलिका, पोटाचे, आतड्याचे विकार याचे निदान व उपचाराचे मोफत महिला तपासणी शिबीर सुश्रुत हॉस्पिटल, फलटण येथे मंगळवार दि. ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आयोजित करण्यात येत असून इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. हेमंत मगर व डॉ. मीरा मगर यांनी केले आहे.
या शिबीरात प्रामुख्याने अन्न गिळताना त्रास होणे, अन्न अडकणे, उलटी होणे, रक्ताची उलटी होणे, कॅन्सर या अन्न नलिकेच्या आजारांबाबत, पित्ताचे विकार, अन्न किंवा रक्ताची उलटी, अल्सरचे निदान, कॅन्सरचे निदान हे जठराचे आजार, संडास साफ न होणे, वरचेवर जुलाब होणे, संडास वाटे रक्तस्त्राव होणे, मूळव्याध व कॅन्सरचे निदान हे मोठ्या आतड्याचे आजार यासाठी सवलतीच्या दरामध्ये अन्न नलिका व जठराची दुर्बिणीतून तपासणी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी, दुर्बिणीतून मोठ्या आतड्याची तपासणी म्हणजे कोलोनोस्कोपी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.