वावरहिर्‍यात युवक युवतींना मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, वावरहिरे,(अनिल अवघडे – वावरहिरे प्रतिनिधी), दि.२०: वावरहिरे ता.माण येथे शौर्य करिअर अकॅडमी नातेपुते व फौजी ग्रुप वावरहिरे यांच्या वतीने परिसरातील पोलिस भरती, सैन्य भरती व स्पर्धा परिक्षाची तयारी करणार्‍या युवक युवतीना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रसिद्ध मराठी व्याकरण व्याख्याते श्री डी. बी. भोसले सर यांचे मोफत एकदिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात परिसरातील एकुण २५ते ३० युवक युवतीं उपस्थित होते. सरपंच चंद्रकांत वाघ,माजी निवृत्त अधिकारी विश्वासराव पांढरे,मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे, सातारा पोलिस अजय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भोसले सर यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्‍या उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत ,युवकांचा पोलिस भरती,सैन्य भरती व स्पर्धा परिक्षेतील टक्केवारी वाढावी या हेतुने सखोल असे मार्गदर्शन करत मैदानी चाचणी,लेखी परिक्षातील अंक गणित,चालु घडामोडी,मराठी व्याकरण,इतिहास व भौगोलिक आदी घटकातील बारकावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.पोलिस भरतीच्या प्रक्रियेला सामोरे जाताना हमखास यशस्वी कसे व्हायचे यासाठी हा त्यांचा कानमंञ उपस्थित युवकांसाठी मार्गदर्शी ठरला.सरपंच वाघ यांनी गावातील पोलिस भरतीची तयारी करणार्‍या युवकांना मोफत साहित्य पुरवणार असुन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भरतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाणार असुन तरी गावातील युवकांनी पोलिस भरती,सैन्य भरती व स्पर्धा परिक्षाची जास्तीत जास्त सराव करावा असे अवाहन केले.माजी अधिकारी विश्वासराव पांढरे यांनी भरतीची तयारी करणार्‍या युवकांना मोफत पुस्तके व आवश्यक जास्त मार्गदर्शनासाठी स्पर्धा परिक्षा संदर्भात सखोल मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींना पाचारण करु असे सांगितले.मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या तरुणांनी आपला वेळ वाया न घालवता अभ्यास करावा.खेड्यातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासुन भरलेली आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गावाचा लौकिक वाढवावा असे सांगितले. अजय भोसले यांनी भरतीसाठी आवश्यक पाञता, आभ्यासक्रम व पोलिस भरतीची तयारी कशी करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या इच्छुक उमेदवारांनी या शिबिराचा लाभ घेत मार्गदर्शनात सांगितलेल्या सर्व बाबी आत्मसात करु अशी ग्वाही दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!