दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज तरडगाव मुक्कामी येणार असून उद्या फलटण शहरात येणार आहे. यानिमित्त फलटण डॉक्टर असोसिएशनतर्फे वारकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटपाचे आयोजन केले आहे.
यावेळी असोसिएशनतर्फे दंतचिकित्सा, डोळे तपासणी, जनरल आरोग्य तपासणी, मोफत औषध उपचार, स्वामी हॉस्पिटल येथे पाच बेड इमर्जन्सी पेशंटसाठी राखीव या आरोग्य सुविधांसह पाणी बॉटल वाटप, बिस्किट वाटप, इमर्जन्सी अॅम्बुलन्सची सोय केली आहे.
हे शिबिर मंगळवार, दि. ९ जुलै २०२४ शिंगणापूर-दहिवडी चौक, कोळकी येथे दुपारी ३ ते ५ यादरम्यान होणार असून यावेळी पीडीए सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.