दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
मालोजीनगर (कोळकी, फलटण) येथे दि.२३ जून ते ६ जुलै २०२४ दरम्यान भरत भाऊसो राऊत यांच्या बंद घराच्या खिडकीची लोखंडी जाळी काढून घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील ५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही व केक फेटण्याचे मशीन असे एकूण ६५०० रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची फिर्याद राऊत यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास म.पो.ना. तांबे करीत आहेत.