दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण व उपजिल्हा रुग्णालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर गुरुवार, दि. ९ जानेवारी २०२५ सकाळी १०:०० वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे काम करणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना तसेच जड वाहन, स्कूल बसचे चालक व मालक यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अक्षय खोमणे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
यावेळी डॉ. अंशुमन धुमाळ वैद्यकीय अधीक्षक, ऋतुजा सोळसकर नेत्र चिकित्सका, अक्षय खोमणे, सहाय्यक निरीक्षक, अक्षय ईश्वरे, सहाय्यक निरीक्षक, दीक्षित वरिष्ठ लिपिक, सागर लाळगे, कनिष्ठ लिपिक, करण लेंबे कनिष्ठ लिपिक, घुले ए. एस. कनिष्ठ लिपिक, विठ्ठल कोळी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, टेम्पो चालक-मालक, स्कूल व्हॅन यांचे चालक-मालक उपस्थित होते.
चालक-मालक यांना मार्गदर्शन करताना अक्षय खोमणे म्हणाले की, आजच्या या वेगवान जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्यांचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची, याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये तसेच आपला फलटण व माण तालुका अपघातमुक्त व्हावा यासाठी वाहन-चालक मालकांचे आरोग्य चांगले व सुरक्षित रहावे, असे सांगितले.