ब्राह्मण गल्लीत मोफत दवाखाना व औषध उपचार केंद्रास वारकऱ्यांचा उत्स्फूर्त; डॉ. प्रसाद जोशी व मिलिंद नेवसेंच्या हस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य | दि. 30 जून 2025 | फलटण | अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना नाशिक, केंद्र फलटण यांचे मार्फत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा निमित्त ओमकार अपार्टमेंट, ब्राह्मण गल्ली, फलटण येथे मोफत दवाखाना व औषध उपचार केंद्रास वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी ९ वाजता या मोफत दवाखान्याचे उद्घाटन प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद निवसे व सीए प्रवीण आवटे यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या मोफत दवाखाना उपक्रमास डॉ. श्रीपाद चिटणीस, डॉ. जयंत जगदाळे, डॉ. त्रिपुटे, डॉ. दत्तात्रय देशपांडे, डॉ. सुहास म्हेत्रे, डॉ. अरुण अभंग, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. निकम, डॉ. बुरुंगले, डॉ.अवधुत गुळवणी इत्यादी डॉक्टरांनी वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिले.

या उपक्रमास क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, फलटण मेडिकल असोसिएशन आणि एम.आर. संघटना यांनी मोफत औषधोपचार दिले. या उपक्रमास संघटनेचे वैभव विष्णुप्रद, नंदकुमार केसकर, चंद्रशेखर दाणी, निरंजन क्षीरसागर, डॉक्टर माधुरी दाणी, स्वानंद जोशी, निखिल केसकर इत्यादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमास पंधराशेच्या वर वारकऱ्यांनी याचा लाभ घेऊन त्याला उपचार करून मोफत औषध उपचार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!