दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील गुरूकुल कॉम्प्युटर एज्युकेशन येथे केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या वतीने आयोजित विविध शासकीय योजना सुरू केल्या असून यामार्फत विविध शासकीय कॉम्प्युटर कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकविले जाणार आहेत.
भारत सरकारच्या ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास योजने’मार्फत विविध शासकीय कॉम्प्युटर कोर्सेस यांचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. फलटण तालुक्यातील सर्वांनी या योजनेचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन गुरूकुल कॉम्प्युटर एज्युकेशन, फलटण यांनी केले आहे.
या योजनांतर्गत खालील कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- सारथी महामंडळांतर्गत मराठा समाजाकरीता ६ महिने व ३ महिने कालावधीचे कोर्सेस
- जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ग्राफिक डिझायनिंग कोर्स, अकाउंटिंग कोर्स, ऑनलाइन सेवा केंद्रचालक कोर्स (प्रशिक्षण कालावधी प्रत्येकी २ महिने) (एससी १२, ओबीसी, एसटी, ओपन २०)
- पीएमजीकेवीवाय – ३ महिने कालावधीचे कोर्सेस पूर्णपणे मोफत
- अण्णाभाऊ साठे महामंडळ अंतर्गत -डेटा एन्ट्री ऑपरेटर कोर्स – ३ महिने (मातंग समाजातील तरुणांसाठी)
- महाराष्ट्र रोजगार व स्वयंरोजगार विभाग एमएसएसडीएस अंतर्गत -डेटा एन्ट्री ऑपरेटर कोर्स – ३ महिने ( वय १८ वर्षांवरील सर्वांसाठी)
- तसेच इतरही विविध डिप्लोमा कोर्स सवलतीत करता येतील.
हे सर्व कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकविले जातात. फक्त अनामत रक्कम घेऊन प्रवेश दिला जातो, कोर्स पूर्ण झाल्यावर सदर अनामत रक्कम शिकणार्यास परत मिळते.
आजच प्रवेशासाठी संपर्क साधा :
शासनमान्य अधिकृत प्रशिक्षण केंद्र,