स्थैय, फलटण दि.९ : फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार व बुलडाणा अर्बन को-ऑप. बँक यांचे संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्षें सुरु असलेली ‘शिवसंदेशकार माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका’ कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती. सदर अभ्यासिका शासनाच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करुन, कोरोना पासून बचावात्मक गोष्टींचा वापर करुन विद्यार्थ्यांची मर्यादीत संख्या ठेऊन सुरु करण्यात येत असल्याचे अभ्यासिका व्यवस्थापनाने कळविले आहे.
या अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी ‘अध्यक्ष, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालय’ या नावे फक्त स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करुन आपला प्रवेश नव्याने निश्चित करावा. जुन्या विद्यार्थ्यांनीही नव्याने आपला अर्ज भरणे अनिवार्य आहे. कोरोना अटींचे पालन करुन ही अभ्यासिका सुरु ठेवणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अगोदर येईल त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असेही अभ्यासिका व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.