
दैनिक स्थैर्य । दि. 24 जुलै 2025 । फलटण । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताच्या उद्देशाने माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्तुत्य उपक्रम आदर्की बुद्रुक येथे राबवण्यात आला आहे. संतकृपा फाउंडेशन संचलित “मोरया डोळ्यांच्या दवाखाना” यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू निदान शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन आमदार सचिन पाटील, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर व भाजपा नेते विलासराव नलवडे, विश्वासराव धुमाळ, सुरेश भोईटे व भागातील भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी संरक्षणासाठी विशेष भर देण्यात आला असून ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मोफत मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम केवळ आरोग्यसेवेसाठीच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेचाही एक उत्कृष्ट नमुना ठरत आहे.