स्थैर्य, फलटण, दि. २०: पाडेगाव, ता. फलटण येथे व बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा येथे सुरु असणाऱ्या कोरोना केअर सेंटर साठी लागणारा नास्ता व चहा हा हॉटेल नंदनवनच्या वतीने सौ. शीतल मिसाळ व संभाजी मिसाळ यांच्या वतीने देण्यात येत आहे. हा उपक्रम महिनाभर सुरु ठेवणार असून आगामी काळामध्ये जर गरज पडली तरी पुन्हा पुढे हा उपक्रम सुरु ठेवणार असल्याची ग्वाही सुद्धा सौ. शीतल मिसाळ व संभाजी मिसाळ यांनी या वेळी दिलेली आहे.
पाडेगाव, ता. फलटण येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे व हॉटेल नंदनवनचे सर्वेसर्वा संभाजी मिसाळ यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत यांनी पाडेगाव, ता. फलटण येथे व बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा येथे सुरु असणाऱ्या कोरोना केअर सेंटर साठी लागणारा चहा व नास्ता हा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. चहा व नास्ता मोफत देण्याचा निर्णय घेऊन १७ दिवस झालेले आहे.
पाडेगाव, ता. फलटण येथे व बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा येथील असणाऱ्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये चहा व नास्ता देण्याचा निर्णय हा तुळजाभवानी मंदिराचे सर्वेसर्वा संभाजी मिसाळ यांनी घेतलेला आहे. मिसाळ दाम्पत्य करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक पंचक्रोशीतून होत आहे.