स्थैर्य, फलटण, दि. १६ : सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हेच लक्षात घेता फलटण तालुक्यातील चौदा गावे हि मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केलेले आहेत. फलटण तालुक्यामधील सांगवी, पाडेगाव, राजुरी, निरगुडी, कापशी, आदर्की खुर्द, काळज, धुळदेव, दालवडी, सुरवडी, शिंदेवाडी, भाडळी खुर्द, खामगाव, तडवळे, जाधववाडी (फ), झिरपवाडी, विंचुर्णी, साखरवाडी, सोनवडी बु., हि गावे मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या गावांमध्ये सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत दूध व भाजीपाला अश्या सेवा सुरु राहतील तर या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व आस्थापना ह्या बंद राहतील. तर स्थानिक ग्रामपंचातीने अत्यावश्यक वस्तू ह्या घरपोच करण्याचे नियोजन करावे. सदर गावामधील हॉस्पिटल व मेडिकल हि नियमानुसार सुरु राहतील, असे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी पारित केलेले आहेत.