युवतीच्या अपहरणप्रकरणी चार जणांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमीनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केले. या प्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, प्रवीण बजरंग बावळेकर, प्रवीणची आई (पूर्ण नाव माहित नाही), त्याचे वडील बजरंग सर्व रा. मेतगुताड ता. महाबळेश्वर व सुनिता गावडे वय ३५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चार सप्टेंबरला प्रवीण व सुनिता यांनी जबरदस्तीने ओमिनी गाडीतून अपहरण केले. प्रवीण याने जबरदस्तीने शरिर संबंध ठेवले, तसेच त्याच्या आई वडीलांनी जातीच्या कारणावरून अनेकदा हिणवले असे संबंधीत युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल या करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!