कृष्णा हॉस्पिटल मधील चार जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 20 : कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेले म्हासोली ता. कराड येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, मुंबई येथून प्रवास करुन आलेला  इंदोली ता. कराड येथील एक 39 वर्षीय पुरुष व ठाणे येथून प्रवास करुन आलेले भारेवाडी ता. कराड येथील पती – पत्नी वय वर्षे 52 व 43 अशा एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 170 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!