दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । रहिमतपूर व औंध पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा घरफोडी करणाऱ्या माने टोळी च्या प्रमुखासह इतर तिघांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलं यांनी दिले . या टोळीला कल म 55 नुसार एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे .
टोळी प्रमुख प्रदीप प्रकाश माने वय 26 वाठार स्टेशन कोरेगाव , अक्षय बाजीराव दोरके वय 20 रा वाठार स्टेशनं , विजय बाळू जाधव 19 भाडळे कोरेगाव , इर्शाद हारुण मुल्ला 36 वाठार स्टेशनं अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहे . वाठार पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील धोंगडे यांनी हा प्रस्ताव सादर केला होता . माने टोळीने रहिमतपूर व औंध वाठार परिसरात दरोडा जबरी चोरी फळविक्रीचे गाडे जाळणे इ. गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते . या टोळीवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडत नव्हता . या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत होती . सातारा जिल्हा हद्दीत पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी 25 प्रस्तावातील 92 जणांना हद्दपार केले आहे . हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्या वतीने एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ , पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव , हवालदार प्रमोद सावंत केतन शिंदे , अनुराधा सणस , वाठार पोलीस ठाण्याचे सचिन जगताप यांनी सबळ पुरावे सादर केल्याने ही तडीपारी यशस्वी झाली.