कासवर लवकरच धावणार चार इलेक्ट्रिक बस

खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात वन विभाग व पठार समितीचा निर्णय


स्थैर्य, सातारा, दि. 19 सप्टेंबर : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला असून, पा विकाणी आता राजमार्गावरील कुमुदिनी तलावापर्यंत ये-जा करण्यासाठी पर्यटकांची इलेक्ट्रिक बसमधून सफर होणार आहे. याचा संकल्प सातारा  वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्याकडून आखण्यात आला आहे. याकरिता पठारावर चार नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, आठ दिवसांत या बस पठारावर धावणार आहेत कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला असून, पठारावर फुलांचा नजारा पाहायला मिळत आहे. पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यासाठी सातारा चन विभाग व कास पठार कार्यकारी समिती

प्रयत्नशील असून, त्याच धर्तीवर इलेक्ट्रिक बसचा पर्याय समोर आलाआहे.  सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्याद्वारे वउपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात एक ते दोन बस या ठिकाणी येतील, असे सांगण्यात येत आहे. कास पठार कार्यकारीसमितीच्या वतीने कास पुष्प पठारावर सुरू असलेल्या दोन बंगल सफारीच्या गाड्या, एक समितीच्या वापरासाठी असलेली गाडी त्याचप्रमाणे ट्रॅक्टर यांचा मेंटेनन्स कास पठार कार्यकारी समितीला वर्षभर परवडत नसताना आता या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, आठ दिवसांत या बस पठारावर येतील, असे सांगण्यात आले आहे.
बस खरेदी करण्याचा विषय घेण्यात आला होता. त्यावर बोलताना आम्ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर एकच बस खरेदी करून ती कशी चालत आहे, हे आपण पाह्या व नंतर बाकीच्या बस खरेदी करू, असे सुचवल्याचे ते म्हणाले.
पालिकेच्या इलेक्ट्रिक वाहनाचे पुढे काय ?पठारावरील हंगाम कालावधीमध्ये पर्यटकांना ये-जा करण्यासाठी सातारा नगरपालिकच्या वतीने इलेक्ट्रिक गाडी त्या ठिकाणी देण्यात  आली आहे. मात्र त्या गाडीचा वापर न करता ती गाडी आजही कासपठारावरील कार्यालयाच्या जवळ उभी असल्याचे पहावयास मिळते.
नवीन अधिकारी नवीन कायदा, असा प्रकार कास पुष्प पठारावर पहावयास मिळत आहे. साताराचे तत्कालीन उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या कालावधीमध्ये दोन गाड्या जंगल सफारी करता खरेदी करण्यात आल्या. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या जंगल सफारीला विरोध केला. त्याच वेळेस ती जंगल सफारी बंद करण्यात आली. त्यानंतर आलेल्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी देखील ही जंगल सफारी सुरू करण्यास विरोध दर्शवल्याने ती जंगल सफारी आजही बंद ठेवण्यात आली आहे. मात्र याच ठिकाणी नव्याने आलेले उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चार नवीन इलेक्ट्रॉनिक बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या बस किती दिवस व कशाप्रकारे सुरू राहणार? हा देखील संशोधनाचा भाग आहे
 कास पठारावर यापूर्वी पर्यटकांसाठी आणलेली ही वाहने धूळ खात पडली असताना, आता इलेक्ट्रिक बसचा अट्टाहास केला जात आहे. कास पुष्प पठारावर पर्यटनाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. या निधीमधूनच पर्यटनाच्या रावाखाली या ठिकाणी वाहनांची खरेदी केली जाते. कासना हंगाम हा एक ते दोन महिन्यांचा असतो; मात्र त्यानंतर ही सर्व वाहने पठारावर धूळ खात उभी असल्याचे पाहावयास मिळते. जंगल सफारी करता दोन गाडया खरेदी केल्या होत्या मात्र पर्यावरण प्रेमीच्या विरोधानंतर ही सफारी बंद केल्या. हंगाम एक ते दोन महिन्याचा असेल तर लाखो रुपयांचा चुराडा वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती कशासाठी करत आहे? 
प्रदीप कदमएकीव समितीचे अध्यक्ष 


Back to top button
Don`t copy text!