स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा जिल्ह्यात करोना संसर्गाचा हाहाकार पडला असताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर बेफिकिरीने वागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहरबानी मुळे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील चार डॉक्टरांवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. हे चार डॉक्टर गेले अनेक महिने पगारी सुट्टी उपभोगत होते शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एकीकडे क रोनाचा कहर वाढत असताना जिल्हा परिषद ,नगरपालिका आणि नगर पंचायतीचा आरोग्य विभाग हा फैलाव रोखण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य यंत्रणा मात्र कोलमडली आहे.
तेथे कुणाचाच कुणाला मिळत नाही राहिले नाही मनमानी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना व डॉक्टरांना पाठीशी घातले जात आहे तसेच जबाबदार अधिकारीच आठवड्याला गायब होत आहेत अशा तक्रारी येऊ लागल्याने याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आणि अहवाल प्राप्त होताच सिव्हिल हॉस्पिटल मधील बालरोग तज्ञ डॉक्टर उज्वला नाईक आर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर प्रज्ञा भोसले _जाधव पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर विशाल जाधव आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना खाडे यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केले आहे.
मागील 15 मार्चपासून हे डॉक्टर कामावर हजर नव्हते तर डॉक्टर विशाल जाधव हे गेली दीड वर्षे शासनाची दिशाभूल करून रजेचे अर्ज देत आहेत यापूर्वी दोन वेळा त्यांना कामावर हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती .मात्र कोणताही खुलासा सादर केलेला नाही डॉक्टर प्रज्ञा भोसले जाधव या गेली आठ महिन्यापासून गैरहजर असून त्यांच्यावरही याप्रकरणी दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यांनीही कोणता खुलासा केला नाही तसेच डॉक्टर अर्चना खाडे या चौदा महिन्यापासून कामावर नाहीत त्या आजारी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरात बंदी केले असून करोनाची महामारी संपल्यावरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कर्तव्यावर हजर होईल. अन्यथा माझ्या जीवाला धोका पोचण्याची शक्यता असल्याचा खुलासा डॉक्टर खाडे यांनी सादर केला आहे. तरीही जिल्हाधिकार्यांनी या चौघांवर ही निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की जे कोणी बेफिकीर पणे वागत आहेत सिव्हिल बाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सिव्हिलच्या यंत्रणा तील सर्व संबंधित डॉक्टरांनी या काळात काळजीपूर्वक आणि जबाबदारीने काम करावे कोणतेही चुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आपले कर्मचारी व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून या आपदगस्त काळात लोकांच्या उपयोगी पडण्याची खबरदारी घ्यावी.