स्थैर्य, सातारा, दि.१०: आसले ता वाई येथील ओंकार कैलास चव्हाण या बेपत्ता युवकाचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे . हा प्रकार लूटमार करणे व अनैतिक संबंधातून घडल्याचे पोलीस तपासात समोर येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .
संशयित सहा जणांनी ओमकार चव्हाण याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रकार करून पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला . रोहन राजेंद्र यादव वय १८ , रोहित संजय घाडगे २० , समाधान उर्फ जंप्या राजेंद्र शिंदे १९ , सलीम राजासाहेब शेख १८ , या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून फरार झालेल्या दोघांचा शोध सुरु आहे . यापैकी एक पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे . या संदर्भात धीरज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार 4 जानेवारी 2020 रोजी ओमकार कैलास चव्हाणं रा आसले ता वाई हा दुपारी साडेचार वाजता पाचवड येथे नेट कॅफेत जाऊन येतो असे सांगून गेला . तो माघारी न परतल्याने वडील कैलास चव्हाण यांनी भुईंज पोलीस स्टेशनला तो मिसिंग असल्याची तक्रार ६ जानेवारी रोजी दिली . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे व सहकाऱ्यांचे पथक तयार करून तपासाची गती वाढविली . सात जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ओमकार चव्हाण याचे गावातील मुलांनी अपहरण करून त्याचा खून केल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती . पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ओमकार याचे चार जानेवारी रोजी अपहरण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली . या हत्याकांडात चार संशयितां सह आणखी दोघांचा समावेश असून त्यातील एक रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराचा समावेश आहे . ते दोघे संशयित फरार असून त्यांचा पोलीस पथकाकडून शोध सुरु आहे . मयत ओमकारला चौघांनी अपहरण करून त्याला दुचाकीवरून कृष्णा नदीच्या काठावर नेले . तेथे ओमकार याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्याला ठार मारण्यात आले . नंतर ओमकारचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला . तत्पूर्वी त्याच्या हातातील सोन्याची अंगठी व मोबाइल संशयितांनी काढून घेतला . ओमकार याचे संशयितांपैकी
एकाच्या बहिणीबरोबर संबंध होते त्यातून च हा प्रकार घडल्या चे पोलिसांनी स्पष्ट केले मात्र तपासाचा भाग म्हणून पोलीस सूत्रांनी त्यावर भाष्य केले नाही .
या कारवाईत सहाय्यक फौजदार ज्योतीराम बर्गे , उत्तम दबडे , पोलीस हवालदार आतिश घाडगे , संजय शिर्के , विजय कांबळे , संतोष पवार , शरद बेबले , साबीर मुल्ला , नितीन गोगावले , प्रवीण फडतरे , मुनीर मुल्ला , रवी वाघमारे , प्रमोद सावंत अमित सपकाळ गणेश कापरे , विशाल पवार विक्रम पिसाळ, रोहित निकम , सचिन ससाणे , वैभव सावंत , संकेत निकम , केतन शिंदे , संजय जाधव , गणेश कचरे यांनी भाग घेतला . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलं व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या टीमचे उल्लेखनीय तपासाबद्दल अभिनंदन केले आहे.