कराड तालुक्यातील चार बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 26 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या  म्हासोली ता. कराड येथील 60   वर्षीय पुरुष,  मलकापूर येथील 9 वर्षांची मुलगी, उंब्रज येथील 22 वर्षीय युवक आणि 53 वर्षीय पुरुष असे एकूण चार कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

या चार रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या चार जणांना आज  सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 336 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!